17 May 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर्स 200 रुपयांच्या पार गेला, आता शेअरची पुढची टारगेट प्राइस जाणून घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कामगिरी केली आहे. ऑक्टोबर 2022 पासून रेल विकास निगम कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 200 रुपये किमतीच्या पार गेले होते.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स एका दिवसात 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 205.45 रुपये किमतीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रेल विकास निगम स्टॉक 2.38 टक्के वाढीसह 204.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, रेल्वे विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारने देशातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या रेल्वे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

तज्ज्ञांच्या मते 2024 या वर्षातील नवीन अर्थसंकल्प जाहीर होईपर्यंत रेल विकास निगम स्टॉक तेजीत वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, अर्थसंकल्पानंतर लोकसभा निवडणुकीपर्यंत रेल विकास निगम कंपनीच्या रेल्वे स्टॉकमधील किमतीत स्थिरता पाहायला मिळू शकते.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 210 रुपयेवरून 220 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 190 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील 1 वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 175 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x