18 May 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स अफाट तेजीत येतोय, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर उसळी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1606.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जुलै 2020 नंतर एका दिवसात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने घेतलेली ही सर्वात मोठी उसळी होती.

इन्फोसिस या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ डिसेंबर 2023 च्या तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1620 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1215.45 रुपये होती. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 8.08 टक्के वाढीसह 1,615 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, इन्फोसिस कंपनीचे शेअर पुढील काळात 1850 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने इन्फोसिस स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकची टारगेट प्राइस 1850 रुपये निश्चित केली आहे.

ब्रोकरेज हाऊसने पूर्वी इन्फोसिस स्टॉकवर 1800 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 1850 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

ब्रोकरेज हाऊस जेफरीज फर्मच्या तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 1750 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. फिलिप कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 1520 रुपयेवरून वाढवून 1690 रुपये केली आहे. इन्फोसिस कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 6106 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत इन्फोसिस कंपनीच्या नफ्यात 1.7 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 6212 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी इन्फोसिस कंपनीचा महुसल संकलन 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह 38821 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 38994 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. स्थिर चलनाच्या बाबतीत इन्फोसिस कंपनीने 4663 दशलक्ष डॉलर्स महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 20.5 टक्के नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 13 January 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x