18 May 2024 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Rudra Gas Enterprise IPO | स्वस्त IPO आला! शेअर प्राईस 63 रुपये, आजच दिसतोय कमीतकमी 40% परतावा, तपशील पहा

Rudra Gas Enterprise IPO

Rudra Gas Enterprise IPO | सध्या शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा धडाका सुरू आहे. लवकरच तुम्हाला रुद्र गॅस एंटरप्राइझ कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही आयपीओमध्ये पैसे लावून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. उद्यापासून म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 पासून रुद्र गॅस एंटरप्राइज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 12 फेब्रुवारी पर्यंत खुला असेल.

रुद्र गॅस एंटरप्राइझ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची अप्पर किंमत बँड 63 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, रुद्र गॅस एंटरप्राइझ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 40 टक्के नफा मिळू शकतो. IPO ची प्राइस बँड आणि ग्रे मार्केट प्रिमियमनुसार रुद्र गॅस एंटरप्राइझ कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

रुद्रा गॅस एंटरप्राइझ कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 2,000 शेअर्स ठेवले आहेत. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 6.3 पट अधिक आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार रुद्र गॅस एंटरप्राइझ ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधांशी संबंधित व्यवसाय करते. कंपनीच्या प्राथमिक व्यावसायिक पोर्टफोलिओमध्ये फायबर केबल नेटवर्क, गॅस वितरण नेटवर्क प्रकल्प आणि बांधकाम उपकरणे आणि वाहने भाड्याने देणे यासारख्या उपक्रमांचा समावेश होतो.

रुद्र गॅस एंटरप्राइझ ही कंपनी म्युनिसिपल गॅस वितरक उद्योगाला देखील सर्वसमावेशक सेवा प्रदान करते. ही कंपनी नागरी कामे, पाइपलाइन बांधकाम, पाइपलाइन नेटवर्क ऑपरेशन आणि सिटी गॅस वितरणाचे देखभाल यासारखे काम देखील हाताळते. कंपनीच्या प्रवर्तक गटात मंजुलाबेन सुरेशभाई पटेल, कुश सुरेशभाई पटेल आणि कश्यप सुरेशभाई पटेल हे सामील आहेत.

रुद्रा गॅस एंटरप्राइझ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 22,48,000 फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या शेअर्सचे एकूण मूल्य 14.16 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स विकण्यात आलेले नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rudra Gas Enterprise IPO GMP Today 07 February 2024.

हॅशटॅग्स

Rudra Gas Enterprise IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x