21 May 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
x

IdeaForge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी शेअर्स तेजीत, 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, डिटेल्स जाणून घ्या

IdeaForge Share Price

IdeaForge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.98 टक्क्यांच्या वाढीसह 845.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.

आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचा IPO मागील वर्षी जून 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 7 जुलै 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. तर आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 770 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीत आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 14.80 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीला 78 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

कंपनीच्या महसुलात देखील लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत कंपनीने 90.9 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीने 7.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीला 7 नवीन पेटंट मिळाले आहेत. तसेच या कालावधीत कंपनीने मोठ्या प्रमाणात संरक्षण संबधित कॉन्ट्रॅक्ट वेळेपूर्वी पूर्ण केले आहेत. आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 92 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1344 रुपये होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 638 ते 672 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO 26 जून ते 30 जून 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IdeaForge Share Price NSE Live 07 February 2024.

हॅशटॅग्स

ideaForge Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x