10 May 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Onion Price Hike | सामान्य लोकांना कांदा रडवणार, घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव प्रचंड वाढले

Onion Price Hiked

Onion Price Hike | नाशिकच्या लासलगाव मंडईत कांद्याचे सरासरी घाऊक भाव सोमवारी अचानक ४० टक्क्यांनी वाढले. येथील कांद्याचे सरासरी दर शनिवारी १२८० रुपये प्रतिक्विंटल होते, ते सोमवारी १८०० रुपये प्रतिक्विंटल झाले. सोमवारी दिवसभरात सुमारे दहा हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. कमीत कमी १००० रुपये तर कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल असा घाऊक दर नोंदविण्यात आला. एपीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कांदा निर्यातदारांनी परदेशी बाजारात विकण्यासाठी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

किरकोळ बाजाराची स्थिती
किरकोळ बाजाराबद्दल बोलायचे झाले तर देशात कांद्याचा सरासरी भाव ३२.२६ रुपये प्रति किलो आहे. मात्र, कुठे १५ रुपये तर कुठे ८० रुपयांची विक्री होत आहे. तसे तर बहुतांश शहरे आणि गावांमध्ये २५ ते ३० रुपये किलो दर आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मिझोराममध्ये कांद्याचा सरासरी किरकोळ भाव ६९.४५ रुपये प्रति किलो होता. हरियाणात ४०.२५ रुपये, चंदीगडमध्ये ३७ रुपये, राजस्थानमध्ये ३६.७२ रुपये, गुजरातमध्ये ३४.६७ रुपये आणि उत्तर प्रदेशमध्ये २९.४५ रुपये प्रति किलो दराने विकले गेले.

किंमत का वाढल्या
केंद्राने कांदा निर्यातीवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कांद्याच्या दरात वाढ झाली. निर्यातबंदी मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने अद्याप औपचारिक अधिसूचना जारी केलेली नसली तरी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी गृहमंत्री के. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारच्या मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. एपीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावयेथील सरासरी दरांवर याचा परिणाम झाला.

कांदा निर्यातीवरील बंदीमुळे भाव घसरले
देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी आणि घाऊक भाव स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी कांदा निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर गेल्या अडीच महिन्यांत सरासरी घाऊक कांद्याचे दर ६७ टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी ६ डिसेंबरला ३९५० रुपये प्रतिक्विंटल असलेला दर १७ फेब्रुवारीला १२८० रुपयांपर्यंत घसरला.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Onion Price Hiked by 40 percent in market check details 20 February 2024.

हॅशटॅग्स

#Onion Price Hiked(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x