18 May 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जबरदस्त तेजीत वाढत होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीच्या शेअरने 215 रुपये किंमत स्पर्श केली होती.

मात्र मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 26 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 159.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयआरईडीए या सरकारी कंपनीचा IPO 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक  185 रुपये प्राईसला स्पर्श करू शकतो. जर हा स्टॉक 154 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 185 रुपयेवर जाईल. IREDA स्टॉकमध्ये 186 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. म्हणजेच हा स्टॉक मंदीच्या काळात 124 रुपये किमतीवर घसरू शकतो.

डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 67 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 335.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आयआरईडीए कंपनीच्या लोनबुकमध्ये वाढ झाली आहे.

मात्र कंपनीचा निव्वळ NPA 2.03 टक्केवरून कमी होऊन 1.52 टक्क्यांवर आला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 44.21 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 1,253.20 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 868.98 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

आयआरईडीए कंपनीचा IPO 30-32 रुपये किमीवर लाँच करण्यात आला होता. एका लॉटमध्ये कंपनीने 460 शेअर्स ठेवले होते. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. या कंपनीचा IPO स्टॉक 56.25 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price today NSE Live 24 February 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x