12 May 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! कंपनी फ्री बोनस शेअर्सचे वाटप करणार, अल्पावधीत पैसा वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून देणाऱ्या नॅपबुक्स लिमिटेड कंपनीने बोनस स्टॉक्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( नॅपबुक्स लिमिटेड कंपनी अंश )

मागील 3 महिन्यांत नॅपबुक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी नॅपबुक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 240.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नॅपबुक्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना रेकॉर्ड तारीखच्या दिवशी 1 शेअरवर 2 बोनस शेअर मोफत देणार आहे. मात्र अद्याप कंपनीने बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. कंपनीने माहिती दिली आहे की, बोनस जारी केल्याच्या 2 महिन्यांच्या आत ते पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. पुढील काही दिवसांत कंपनी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्याची शक्यता आहे.

मागील एका महिन्यात नॅपबुक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 3 महिने हा स्टॉक होल्ड केले होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 122.30 टक्के वाढले आहे.

मागील एका वर्षात नॅपबुक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 212 टक्के परतावा कमावून दिला आहे. नॅपबुक्स लिमिटेड कंपनीमध्ये म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदारांचा वाटा फार कमी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Naapbooks Share Price NSE Live 09 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x