15 May 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअर्समध्ये अफाट तेजी, पुन्हा मालामाल करणार, स्टॉक तेजीचे कारण काय?

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के घसरणीसह 98.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 112.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )

एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी मालकीच्या वीज उत्पादक कंपनीला गुजरातमध्ये 500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे मूल्य 2,700 कोटी आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.81 टक्के वाढीसह 113.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, त्यांच्या पूर्ण मालकीच्या SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेड या उपकंपनीने गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड कंपनीकडून 500 मेगावॅट सौर क्षमतेचा प्रकल्प उभारणीचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये GUVNL फेज-XXI 500MW पॉवर प्रोजेक्टमध्ये 100MW आणि 400MW ग्रीन शू पर्याय देण्यात आला आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी 2,700 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा प्रकल्प खवरा, गुजरात येथील GIPCL सोलर पार्कमध्ये विकसित करणे नियोजित आहे.

मागील सहा महिन्यांत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 31 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

मागील पाच वर्षांत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 310 टक्के परतावा कमावून दिला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 146 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.39 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39,769.53 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x