10 May 2024 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट
x

Shriram Pistons Share Price | अशी संधी सोडू नका! हा शेअर 70 टक्के परतावा देईल, अल्पावधीत मालामाल होणार

Shriram Pistons Share Price

Shriram Pistons Share Price | श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एमकेच्या तज्ञानी श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किमतीच्या तुलनेत 70 टक्के अधिक वाढू शकतात. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज स्टॉक 4.02 टक्के वाढीसह 1,705.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

एमके फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2450 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 70 टक्के अधिक वाढू शकतो. श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज या कंपनीने पिस्टन, पिस्टन रिंग्ज, इंजिन व्हॉल्व्ह मार्केटचा 40-45 टक्के वाटा काबीज केला आहे. तर CNG इंजिन मार्केटमधील 90 टक्के वाटा काबीज केला आहे.

श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीने टाटा मोटर्स कंपनीसोबत 40 वर्षांपूर्वी भागीदारी केली होती. ती अजूनही कायम आहे. तज्ञांच्या मते, वाहनांमध्ये हायब्रीड इंजिन्स, सीएनजी आणि जैवइंधनाच्या वाढत्या वापरामुळे श्रीराम पिस्टन अँड रिंग्स कंपनीला फायदा होऊ शकतो. आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत या कंपनीच्या विक्रीमध्ये 10 टक्के वाढीची अपेक्षा आहे.

सध्या श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीचा स्टॉक 18x च्या P/E मल्टीपल वर ट्रेड करत आहे. तर आर्थिक वर्ष 2024-26 या काळात कंपनीच्या विक्रीत 13 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. आणि श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीच्या स्टॉक EPS मध्ये वार्षिक 17 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shriram Pistons Share Price NSE Live 15 March 2024.

हॅशटॅग्स

Shriram Pistons Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x