10 May 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार
x

RailTel Share Price | 216 टक्के परतावा देणारा रेलटेल शेअर तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढे मल्टिबॅगर परतावा?

RailTel Share Price

RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला नुकताच ओडिशा कंप्यूटर एप्लीकेशन सेंटरने 113.46 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. ऑर्डर मिळाल्याची बातमी येताच शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

मार्च 2024 च्या सुरुवातीला रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, ओडिशा राज्य परिवहन प्राधिकरणाने विद्यमान कमांड कंट्रोल सेंटरला युनिफाइड कमांड कंट्रोल सेंटर अपग्रेड करण्यासाठी आणि राज्य परिवहन प्राधिकरणाचे इंटेलिजेंट एन्फोर्समेंट मॅनेजमेंट सिस्टम बनवण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर संबंधित LOA प्राप्त झाल्यापासुन 365 दिवसांच्या आत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 352.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

फेब्रुवारी 2024 मध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कंपनीला डिझाइन, विकास, अंमलबजावणी, ऑपरेशन्स आणि देखभाल संबंधित 139.73 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला OTT प्लॅटफॉर्मच्या डिझाइन, विकास, अंमलबजावणी, ऑपरेशन्स आणि देखभाल यासाठी मास्टर सिस्टम इंटिग्रेटर संबंधित कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी OFC केबल टाकण्याचे आणि देखभालीचे काम दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 18.21 कोटी रुपये आहे. याशिवाय रेलटेल कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाने 124.90 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी भारतात ब्रॉडबँड टेलिकॉम आणि मल्टीमीडिया नेटवर्क सुविधा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह 308.40 रुपये किमतीवर आले होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 339.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 216 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| RailTel Share Price today on 16 March 2024

हॅशटॅग्स

Railtel Share price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x