18 May 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसमध्ये तुफान तेजी येणार?

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी जिओ लीजिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 40 कोटी रुपयेची गुंतवणूक केल्याची अपडेट जाहीर केली आहे. जिओ लीजिंग सर्व्हिसेस कंपनीची स्थापना जंगम मालमत्तेची कामे भाडेतत्वावर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )

या सकारात्मक बातमीचा परिमाण जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकवर देखील पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 2.71 टक्के वाढीसह 346.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने सेबीला कळवले आहे की, मंगळवारी त्यांनी जेएलएसएल कंपनीचे प्रत्येकी 10 रुपये मूल्याचे चार कोटी शेअर्स 40 कोटी रुपयेला खरेदी केले आहे. जिओ लीजिंग सर्व्हिसेस ही जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीची उपकंपनी विविध प्रकारच्या जंगम मालमत्ता भाड्याने देण्याचा व्यवसाय करते.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह क्लोज झाले होते. मंगळवारी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 353.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने स्पर्श केलेली कमाल उच्चांक किंमत 357.85 रुपये होती. तर किमान किंमत पातळी 346.75 रुपये होती.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 374.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.65 रुपये होती. जिओ फायनान्शिअल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,24,461.53 कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी मुख्यतः नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीची स्थापना कायदा 1956 अंतर्गत 22 जुलै 1999 रोजी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केली होती. नंतर जानेवारी 2002 मध्ये या कंपनीने आपल्या नावात बदल करून रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड असे केले 25 जुलै 2023 रोजी पुन्हा या कंपनीने आपले नाव बदलून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड असे केले.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी आपल्या उपकंपन्यांच्या माध्यमातून विविध सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या उपकंपनी गटात जियो फाइनेंस लिमिटेड, जियो इंश्योरेंस ब्रोकिंग लिमिटेड और जियो पेमेंट सॉल्यूशंस लिमिटेड और जियो पेमेंट्स बैंक लिमिटेड या कंपन्या सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 21 March 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x