21 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Metro Brands Share Price | बिग बुल फॅमिलीने खरेदी केला शेअर, एका दिवसात 20% वाढला, वेळीच खरेदी करणार?

Metro Brands Share Price

Metro Brands Share Price | मेट्रो ब्रँड कंपनीचे शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांच्या वाढीसह 1237.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. बुधवारी दिवसा अखेर मेट्रो ब्रँड कंपनीचे शेअर्स 13.42 टक्के वाढीसह 1170.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी मेट्रो ब्रँड स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 1,123.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( मेट्रो ब्रँड कंपनी अंश )

मेट्रो ब्रँड्स लिमिटेड कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी.74.17 टक्के वाटा प्रवर्तकांनी धारण केला आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25.83 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या प्रवर्तक गटात मुमताज जाफर, सुलेमान सदरुद्दीन भांजी, रफिक मलिक, फराह मलिक भानजी, अलीशा रफिक मलिक यांचा समावेश आहे. शेअर बाजारातील दिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये डिसेंबर अखेरीस मेट्रो ब्रँड कंपनीचे 4.80 टक्के भाग भांडवल म्हणजेच 1,30,51,206 शेअर्स होते.

ऑक्टोबर-डिसेंबर 2024 या तिमाही कालावधीत मेट्रो ब्रँड्स कंपनीने 113 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला होता. याच तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 6.14 टक्के वाढीसह 635.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीने 598.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मेट्रो ब्रँड्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 1955 साली झाली होती. ही कंपनी विविध प्रकारच्या पादत्राणांची ब्रँड म्हणून ओळजली जाते. मेट्रो ब्रँड्स कंपनीचा IPO डिसेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात आला 485-500 रुपये इश्यू किमतीवर लाँच करण्यात आला होता. मात्र लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीच्या IPO शेअर्सने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार आणि अस्थिरता पाहायला मिळाली होती. बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 89.64 अंकांच्या वाढीसह 72,101.69 अंकां क्लोज झाला होता. ट्रेडिंग सेशन दरम्यान, सेन्सेक्स निर्देशांकाची उच्चांक पातळी 72,402.67 होती. तर 71,674.42 ही नीचांकी पातळी होती. निफ्टी-50 निर्देशांक 21.65 अंकांच्या वाढीसह 21,839.10 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Metro Brands Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

#Metro Brands Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x