19 May 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवून पैसा गुणाकारात वाढवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, संधी सोडू नका

Bonus Shares

Bonus Shares | क्युपिड लिमिटेड या कंडोम उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2034.75 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( क्युपिड लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच क्युपिड लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2107.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

क्यूपिड लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्यासाठी 4 एप्रिल 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2014 रोजी क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2034.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी क्यूपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.23 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2826.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 235.30 रुपये होती.

मागील एका वर्षात क्युपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 731 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 244.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2034.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 419 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 391.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 73 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Cupid Share Price 23 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x