14 May 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

BSE Share Price | अवघ्या 1 वर्षात 450% परतावा देणारा शेअर 1000 रुपयांनी वाढणार, लाईफ चेंगर स्टॉक खरेदी करणार?

BSE Share Price

BSE Share Price | मागील काही काळापासून शेअर बाजारात कमजोर जागतिक संकेतांमुळे अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसह 72,600 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 40 अंकांच्या घसरणीसह 22000 अंकावर ट्रेड करत होते. ( बीएसई लिमिटेड कंपनी अंश )

मागील काही महिन्यांपासून बँकिंग आणि एफएमसीजी स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तर ऑटो, मेटल आणि आयटी क्षेत्रात किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.71 टक्के वाढीसह 2,465.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीकडे वैविध्यपूर्ण महसूल मॉडेल आहे. कंपनीकडे कॅश मार्केट, फ्युचर्स ट्रेडिंग, सीडीएसएलसह इतर अनेक व्यवसाय आहेत. आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान कंपनीची कमाई 2.5 पट वाढण्याची अपेक्षा आहे.

कंपनीची प्रीमियम उलाढाल आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 35 टक्के सरासरी वाढीसह 270 लाख कोटी रुपयेवर जाण्याचा अंदाज आहे. FII-DII ने देखील बीएसई लिमिटेड कंपनीमधील गुंतवणूक हिस्सा वाढवला आहे. कंपनीच्या मूल्यांकनात देखील सुधारणा पाहायला मिळत आहे. म्हणून हा स्टॉक सध्या गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार लवकरच NSE चा IPO लाँच केला जाणार आहे. बरेच गुंतवणुकदार NSE लिमिटेड कंपनीच्या IPO ची वाट पाहत आहेत. काही गुंतवणूकदारांनी तर एनएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स IPO लाँच होण्यापूर्वीच खरेदी करून ठेवले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2900 ते 3500 रुपये किमतीवर जाऊ शकतात. पुढील काही वर्षात या कंपनीचे शेअर्स 5000 रुपये किंमतीवर जाऊ शकतात. या कंपनीच्या शेअर्सने 2900 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती, त्यानंतर हा स्टॉक घसरणीमुळे 2200 रुपये किमतीवर आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BSE Share Price NSE Live 27 March 2024.

हॅशटॅग्स

BSE Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x