15 May 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा
x

GOCL Share Price | शेअरने एका दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

GOCL Share Price

GOCL Share Price | जीओसीएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अफाट तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअर्सने ट्रेडिंग सेशन दरम्यान 20 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या जीओसीएल कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने 3,402 कोटी रुपये मूल्याच्या जमिनीचा काही भाग विकण्यासाठी स्क्वेअरस्पेस बिल्डर्ससोबत एक करार केला असल्याची माहिती दिली आहे. ( जीओसीएल कंपनी अंश )

त्यामुळे गुंतवणूकदारांनी हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली होती. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी जीओसीएल स्टॉक 19.99 टक्के वाढीसह 454.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जीओसीएल ही कंपनी डिटोनेटर्स, इग्निटर्स, क्षेपणास्त्र प्रणालीसाठी पायरो उपकरणे आणि कॅनोपी सेव्हरेन्स सिस्टम यासारखी संरक्षण क्षेत्रात वापरली जाणाऱ्या उपकरणांची निर्मिती करते. मागील सहा महिन्यांत जीओसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये 3.4 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. याकाळात निफ्टी 50 निर्देशांकामध्ये 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मागील एका वर्षात जीओसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मेहता इक्विटीज लिमिटेड फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, जीओसीएल कंपनीने हैदराबादमध्ये 264.5 एकर जमीन संपादित केली होती. या जमिनीचे 3402 कोटी रुपये मूल्यावर विक्री करण्यासाठी स्क्वेअरस्पेस बिल्डर्सशी करार करण्यात आला आहे.

ही बातमी प्रसारित होताच जीओसीएल कंपनीच्या शेअर्सने 20 टक्के अप्पर सर्किटला धडक दिली होती. शेअर बाजारातील तज्ञांनी जीओसीएल कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 400 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 490 रुपये ते 495 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GOCL Share Price NSE Live 30 March 2024.

हॅशटॅग्स

GOCL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x