17 May 2024 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिलीचा मालामाल करणारा शेअर नवी उंची गाठणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाहीत फेडरल बँकेचा ग्रॉस अडवांस 20 टक्क्यांच्या वाढीसह 2,12,758 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत बँकेचा अडवांस 1,77,377 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( फेडरल बँक अंश )

31 मार्च 2023 रोजी फेडरल बँकेकडे एकूण 2,52,583 कोटी रुपये ठेवी होत्या. वार्षिक आधारावर यात 18 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत फेडरल बँकेकडे 2,13,386 कोटी रुपयेच्या ठेवी होत्या. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी फेडरल बँक स्टॉक 0.98 टक्के वाढीसह 153.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

फेडरल बँकेच्या किरकोळ पतपुरवठ्यात 25 टक्के आणि घाऊक पतपुरवठ्यात 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच बँकेचा रिटेल आणि होलसेल गुणोत्तर 56:44 आहे. तज्ञांच्या मते, फेडरल बँक शेअर्समध्ये 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. काही तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स 190 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

सिटी फर्मने फेडरल बँकेच्या स्टॉकवर 135 रुपये टार्गेट प्राइज निश्चित करून स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅन्ले ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 165 रुपये टार्गेट प्राइज निश्चित केली आहे. तर नोमुरा फर्मच्या तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स 190 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2023 पर्यंत फेडरल बँकेचे 7,27,13,440 इक्विटी शेअर्स म्हणजेच 3.02 टक्के भाग भंडवल होते. या शेअर्सचे एकूण मुल्य 1,125 कोटी रुपये आहे. फेडरल बँकेने मार्च 2024 तिमाहीचे शेअर होल्डिंग पॅटर्न अद्याप जाहीर केलेले नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price NSE Live 05 April 2024.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x