21 May 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Eyantra Ventures Share Price | 3 रुपयाच्या शेअरने कुबेर कृपा केली, 3 वर्षात दिला 29287% परतावा, गुंतणूकदार करोडपती

Eyantra Ventures Share Price

Eyantra Ventures Share Price | इयांत्रा व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 29,287 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इयांत्रा व्हेंचर्स कंपनी अंश )

आता या कंपनीचे शेअर्स 963.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 305.20 रुपयेवरून 216 टक्क्यांनी वाढले आहेत. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी इयंत्रा व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 963.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

इयंत्रा व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स फेब्रुवारी 2024 मध्ये 63 टक्के मजबूत झाले होते. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स फक्त 3 टक्के वाढले होते. 26 फेब्रुवारी 2024 रोजी इयंत्रा व्हेंचर्स कंपनीच्या स्टॉकने 963.90 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 305.25 रुपये होती. या नीचांकी किमतीवरून शेअरची किंमत 216 टक्के वाढली आहे.

इयंत्रा व्हेंचर्स ही कंपनी मुख्यतः IT आणि IT सक्षम सेवांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी पूर्वी पुनित कमर्शियल लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. या कंपनीची स्थापना 1984 साली हैदराबाद येथे झाली होती. इयंत्रा व्हेंचर्स कंपनीने डिसेंबर 2023 च्या तिमाहीत 27 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.

डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 23 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 4.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eyantra Ventures Share Price BSE Live 13 April 2024.

हॅशटॅग्स

#Eyantra Ventures Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x