27 April 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता

Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019, BJP Maharashtra

मुंबई: भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पण अशात भाजप आता विद्यामान आमदारांचं तिकीट कापणार की काय अशी चर्चा आहे. विदर्भात आणि नागपूरमध्ये विद्यमान आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज मंत्र्यांची मेगाभरती झाली. त्यामुळे भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यात ज्या विद्यमान आमदारांनी गेली ५ वर्ष पक्षासाठी कामं केली नाही अशा आमदारांचं भाजप तिकीट कापरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीमध्ये कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

राज्यातील ६ विभागात ६ संघटन मंत्र्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. संघटन मंत्री मुंबई – सुनील कर्जतकर, कोकण ठाणे – सतीश धोंडे, उत्तर महाराष्ट्र – किशोर काळकर, मराठवाडा – भाऊराव देशमुख, विदर्भ – उपेंद्र कोठेकर, पश्चिम महाराष्ट्र – रवींद्र अनासपुरे यांच्याकडे एबी फॉर्म दिले असल्याची माहिती आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने व्यवस्था केली आहे. दरम्यान, आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपाची आज चौथी मेगा भरती होणार आहे. काँग्रेसचे सहा नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले मालाडमधील आमदार अस्लम शेख यांचा समावेश आहे. याशिवाय, राहुल बोंद्रे (बुलढाणा), काशीराम पावरा (धुळे), डी.एस. अहिरे (धुळे), सिद्धराम म्हेत्रे (सोलापूर) आणि भारत भालके (पंढरपूर) हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. मात्र राणेंचा प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x