28 April 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

२०१५ मध्ये तृप्ती सावंत यांचा राणेंविरुद्ध भावनिक वापर केला; २०१९ मध्ये पत्ता कट

MLA Trupti Sawant, MLA Bala Sawant, Mayor Vishweshwar Mahadeshwar, Shivsena, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: शिवसेनेत दाखल झालेल्या प्रदीप शर्मा, दिपाली सय्यद या बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर होत असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील शिवसेनेते तिकीट दिले आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या तिकिटावर ते वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विद्यमान शिक्षणमंत्री आशिष शेलार आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, यंदा हा मतदारसंघ जागावाटपाच्या वाटाघाटीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे तिथून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाजूच्याच वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आधी शिवसेनेचे बाळा सावंत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महाडेश्वरांसाठी सेफ मानला जात आहे.

दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आलं आहे. दरम्यान उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची अजिबात दखल घेतली नाही. २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या. बाळा सावंत यांचा मृत्यू झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी मातोश्रीच्या अंगणातच सेनेला धडा शिकविण्यासाठी नारायण राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र तगडा उमेदवार दिल्याने बिथरलेल्या शिवसेनेने भावनिक विषयाला हात घालून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना पुढे करत निवडणूक जिंकली. मात्र आता भावनिक मुद्दा नसल्याने आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कट करून त्याजागी विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून आज अनेक दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x