26 April 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजप मुंबई महानगरपालिकेतील पाठिंबा काढणार; तरी सेना सेफ: सविस्तर वृत्त

BMC, Shivsena, BJP Mumbai

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. राज्यातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने अखेर शिवसेना भाजपसोबतचं नातं तोडून आपला मुख्यमंत्री बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याची ही तयारी ठेवली आहे.

अरविंद सावंतांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीना दिला. एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या या कृत्रीमुळे युती तुटली असंच म्हणावं लागेल. कारण राष्ट्रवादीने तशी अट ठेवल्याची माहिती आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची घटस्फोट घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नवा संसार थाटण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंर भारतीय जनता पक्षाने सेनेला कोंडित पकडण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेतला पाठिंबा भारतीय जनता पक्ष काढून घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाने आज संध्याकाळी ७ वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या कोअर कमिटीच्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सेनेला कोणत्याही परिस्थितीत कोंडित पकडायचं, असा डाव भारतीय जनता पक्ष आखण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीत बैठका सुरू आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिला तर नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. पण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा मुंबई महापालिकेत दिला आहे. आता शिवसेना एनडीएमधून बाहेर पडत असल्यामुळे मुंबई महापालिकेतील युती पुढे कायम राहणार की भारतीय जनता पक्ष पाठिंबा काढून घेणार याकडे लक्ष लागलं आहे. या निम्मिताने आता नवी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा ११३ आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे अपक्षांसह एकूण ९४ नगसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतल्यास त्यांचा मॅजिक ११४चा आकडा पूर्ण होत नाही. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. काँग्रेसने जर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्यास, काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद जावू शकते. त्यामुळे पहारेकरी म्हणून असलेल्या भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेतेपद न स्वीकारल्याने, दुसर्‍या क्रमांकावरील मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले. यासाठी सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

भारतीय जनता पक्षाने सुरुवातीच्या काही कालावधीतच पहारेकरी म्हणून चोख भूमिका बजावली होती. परंतु त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेण्याचे आदेश महापालिकेतील भारतीय जनता पक्ष नेत्यांना दिल्यामुळे ते शांत राहिले. त्यामुळे पहारेकरी म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका बजावू शकलेले नाहीत. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये एकप्रकारे नैराश्यच पसरले होते. पण आता शिवसेनेची अडेलतट्टू भूमिका पाहता, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकही आक्रमक होण्याच्या तयारीला लागले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोज कोटक हे खासदार झाल्यानंतर, त्यांची महापालिकेतील उपस्थिती कमी झाली होती. परंतु येत्या काळात मनोज कोटक हेही आता आवर्जुन महापालिकेच्या सभांना उपस्थित राहत शिवसेनेवर शरसंधान साधण्याची संधी सोडणार नाही. भारतीय जनता पक्षाची या दृष्टीकोनातून रणनितीही तयार होत असून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, अतुल शहा, अभिजित सामंत, विद्यार्थी सिंह, अ‍ॅड. मकरंद नार्वेकर, प्रकाश गंगाधरे, कमलेश यादव, दक्षा पटेल, ज्योती अळवणी, प्रिती सातम, संदीप पटेल, सुनील यादव, सुषम सावंत, राजश्री शिरवाडकर, योगिराज दाभाडकर, हरिष छेडा, स्वप्ना म्हात्रे आदींची टिम महापालिकेत आता अधिक आक्रमक होताना दिसणार आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x