27 April 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, फक्त बोंबलून प्रश्न मांडू नका

Chief Minister Uddhav Thackeray, PM Narendra Modi

नागपूर: नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली.

सामना हे वृत्तपत्र कधीही वाचत नाही असं सांगणाऱ्यांनी आज सभागृहात सामना दाखवला. याचाच अर्थ सामना हे सामान्य माणसाचं शस्त्र आहे हे सिद्ध झालं आहे. सामना तेव्हाच वाचला असता तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. नागपुरातल्या अधिवेशना दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांना शिमगा करायचाच असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करावा राज्य सरकारच्या नावाने करु नये असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी इथं गळा काढण्यापेक्षा केंद्राकडे गळा काढा, केंद्रात विरोधी पक्षाचं सरकार आहे. केंद्राकडून राज्याला येणारा जीएसटी परतावा जवळपास १५ हजार कोटी रुपये आहे. केंद्राने पहिला हफ्ता साडेचार हजार कोटी रुपये आलेले आहे. शिमगा करायचा असेल तर केंद्रा सरकारच्या नावाने करावा, राज्य सरकारच्या नावाने करु नका असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली गेली याची आकडेवारी दिली आहे. कोल्हापूर पूर – राज्य सरकारने केंद्राकडे ७ हजार कोटी मागितले आहेत. अवकाळी पावसासाठी केंद्राकडे ७ हजार कोटी मागितले आहेत. जे शेतकऱ्यांसाठी आज सरकारकडे गळा काढत आहेत, त्यांनी जरा तिकडे (केंद्राकडे) जाऊन गळा मोकळा करावा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

 

Web Title:  Center Government Should not fire Bombs Youth Chief Minister Uddhav Thackerays Attack PM Narendra Modi.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x