3 May 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

पवारांनी शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले आणि त्यांनी ते टिपले: अमित शहा

Union Minister Amit Shah, Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena, BJP

नवी दिल्ली: एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक मुद्यांना हात घातला आहे. तुम्ही नवे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात का? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे का? असे सवाल अमित शाह यांना करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भारतीय जनता पक्षात माझ्यापक्षेही अनेक वरिष्ठ नेते आहेत. कोणताही निर्णय हा पक्षच घेत असतो. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणं यशस्वी होवो आणि स्वातंत्र्यादम्यान स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेल्या भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचं आमचं स्वप्न आहे, असं शाह म्हणाले.

‘महाराष्ट्रात शरद पवार यांनी शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले आणि शिवसेनेनं ते टिपले,’ असा घणाघात अमित शहा यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्रात सध्या जी काही राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यात आम्हाला अपयश आलं असं मला वाटत नाही, असंही अमित शहा म्हणाले. अमित शहा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपद आणि निवडणूकपूर्वी स्थिती यावरही भाष्य केलं आहे.

दरम्यान, ‘इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह’मधील चर्चासत्रात शहा बोलत होते. सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं तापलेल्या राजकारणावर शहा यांनी यावेळी भाष्य केलं. ‘हा कायदा अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे. कितीही राजकीय विरोध झाला तरी माघार घेतली जाणार नाही,’ असं अमित शहा यांनी ठणकावलं आहे. ‘जामिया मिलियामध्ये पोलिसांनी केलेली कारवाई ही हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी होती,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title:  Union Home Minister Amit Shah Slams Chief Minister Uddhav Thackeray Over Maharashtra Politics.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x