26 April 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

नगराध्यक्षपद: राणे कुटुंबियांवर टीका करून मंत्रिपद मिळवणाऱ्या केसरकारांना भाजपचा दणका

Minister Deepak Kesarkar, MP Narayan Rane

सावंतवाडी: एकीकडे मुंबईत नव्या ठाकरे सरकारच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे कोकणात भाजपनं शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडीमध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी रविवारी मतदान झाले. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, भाजपचे अधिकृत उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब, महाविकास आघाडीचे खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, काँग्रेसचे ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर हे निवडणूक लढवत होते.

मागील अनेक वर्षांपासून इथे शिवसेनेचाच नगराध्यक्ष होता. मुळात दीपक केसरकर यांचा हा गड मानला जात होता. त्यामुळे दीपक केसरकर विरूद्ध नारायण राणे अशा प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीमध्ये भाजपची सरशी झाली आणि सावंतवाडीचं नगराध्यक्षपद शिवसेनेच्या हातून निसटलं. सावंतवाडी येथील जिमखाना परिसरात आज मतमोजणी झाली.

मुळात कोणाच्या विकासात केसरकर यांचा काहीच हात नसून ते केवळ राणे कुटुंबियांवर आरोप आणि टीका करून स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचं कोकणात सर्वश्रुत आहे. शिवसेनेकडे देखील दुसरा पर्याय नसल्याने केसरकरांचं फावत असल्याचं स्थानिक शिवसैनिकांना वाटतं आहे. त्यामुळे ते पुन्हा तोच एक कलमी कार्यक्रम पुन्हा ५ वर्ष सुरु ठेवतील अशीच स्थानिक लोकांची धारणा झाली आहे.

 

Web Title:  Shivsena MLA Deepak Kesarkar shocked taking oath Today Minister lost Mayoral Seat at Sawantwadi.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x