27 April 2024 8:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VIDEO- नको ते कीर्तन! इंदुरीकर महाराजांवर किर्तनामुळे गुन्हा दाखल होणार

Nagar Indirankar Maharajs Kirtan, abortion diagnosis speech

नगर: अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होते. इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.

गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वक्तव्याने हभप इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे.

‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे इंदुरीकर महाराजांचे किर्तन समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले जातात. या व्हिडीओवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ‘सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे महाराज म्हटले आहेत. तसेच, स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी मुलं होतात. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब…असे विधान इंदुरीकर यांनी ४ जानेवारी रोजी यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले आहे. तसेच, पुराणकाळातील एक दाखलाही महाराजांनी यावेळी दिला होता.

 

Web Title: Nagar Indirankar Maharajs Kirtan gone viral investigate about abortion diagnosis his speech.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x