21 May 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खिसा पैशाने भरतोय, स्टॉकची जोरदार खरेदी IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा
x

वुहानमधील जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेची कोरोना व्हायरसच्या फैलावात भूमिका - WHO

Lockdown, China Wuhan

वूहान, ९ मे: जागतीक आरोग्य संघटनेवरही (WHO) चीनची बाजू घेत असल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, आता डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की चीनमधील वुहान मार्केटच कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.

डब्ल्यूएचओचे फूड सेफ्टी झुनॉटिक व्हायरस एक्सपर्ट डॉ. पीटर बेन ऐंबरेक यांनी म्हटले आहे, की ‘कोरोना व्हायरसच्या प्रसारात वुहान मार्केटची भूमिका असल्याचे स्पष्ट आहे, नेमकी भूमिका काय हे अम्हाला माहित नाही. हाच व्हायरसचा स्रोत आहे, की येथून तो परसला, की योगायोगाने काही रुग्ण मार्केटमध्ये आणि जवळपास सापडले.’ या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनने जानेवारी महिन्यात वुहान मार्केट बंद केले होते.

पुढे ते म्हणाले की जिवंत प्राण्यांची बाजारपेठ जगभरातील अनेक लोकांच्या कमावण्याचं साधन असून प्रशासनाने त्या बंद करण्याऐवजी सुधारणा करण्याबाबत विचार केला पाहिजे. “अशा परिस्थिती अन्न सुरक्षा कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच अनेकदा बाजारपेठांमध्ये अशा गोष्टी घडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही,” असं पीटर बेन यांनी सांगितलं आहे. प्राण्यांमधून माणसांपर्यंत आजार पोहोचू नये यासाठी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा दर्जा वाढवण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे करोनाचा फैलाव झाला आहे याची माहिती मिळवण्यात वेळ लागण्याची शक्यता आहे. ज्यांना सुरुवातीच्या काळात करोनाची लागण झाली त्यांच्या मुलाखती घेऊन आरोग्य तज्ञांना विस्तृत अभ्यास करण्याची गरज आहे. आजारी पडण्याआधी कशा पद्धतीने ते प्राण्यांच्या संपर्कात आले होते हे समजून घ्यावं लागेल,” असं पीटर बेन यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: The World Health Organization (WHO) has also been accused of favoring China. However, the WHO has now said that the Wuhan market in China is responsible for the spread of the corona virus. He also said that more research is needed in this direction.

News English Title: Story corona virus China Wuhan lockdown live animal markets should not be closed says WHO News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x