27 April 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज - निर्मला सीतारामन

नवी दिल्ली, १३ मे: स्क्षूम, लघु, मध्यम कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटीचे कर्ज देण्यात येईल. त्यासाठी कुठल्याही गॅरटीची आवश्यकता नाही. ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होईल. एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही.

संकटात अडकलेल्या दोन लाख MSME ला कर्जासाठी २० हजार कोटी रुपयांची मदत केली जाईल. एमएसएमईला एका वर्षापर्यंत कर्जाचे हफ्ते (EMI) भरण्यापासून सूट मिळेल. तसेच २५०० कोटीपर्यंतच्या लघु, लघु आणि मध्यम उद्योगांना याचा फायदा मिळेल. लघु, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राला ३ लाख कोटी रुपयांचं कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय देण्यात येईल. यामुळे ४५ लाख एमएसएमईला याचा फायदा होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे कुटीर लघुउद्योगांसाठी अशी सहा पावलं उचणार आहोत. यातील दोन ईपीएफसाठी, एनबीएफसीशी निगडीत दोन निर्णय आणि एक निर्णय एमएफयामुळे ४५ लाख एमएसएमईला याचा फायदा होईल.आयशी निगडीत आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

देशाच्या विकासासाठी हे पॅकेज आहे. देशातील गरीब, स्थलांतरीत लोकांसाठी डीबीटी एक चांगली सोय ठरली आहे. त्यांना थेट मदत मिळत आहे. लोकल ब्रँडना ग्लोबल बनविण्यात येणार आहे. अनेक अधिकारी, तज्ज्ञ, मंत्रालयांशी पंतप्रधानांनी चर्चा करून ही योजना घोषित केली आहे. १७५ गिगावॉट सोलार एनर्जी, जनधन सारख्या योजना स्वावलंबी बनण्यासाठी पाया ठरणार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जमीन, कामगार, रोखता आणि कायदे या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.

 

News English Summary: Rs 20,000 crore will be provided for loans to two lakh MSMEs in crisis. MSMEs will be exempted from paying loan installment (EMI) for up to one year. It will also benefit small, medium and medium enterprises up to Rs 2,500 crore. A loan of Rs 3 lakh crore will be given to the Small, Medium Enterprises (MSMEs) sector without any guarantee. This will benefit 45 lakh MSMEs, said Finance Minister Nirmala Sitharaman.

News English Title: Collateral Free Automatic Loans To Msmes Worth Rs3 Lakh Crore Says Fm Nirmala Sitharaman News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x