26 April 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राज्यात १५ हजार ७८६ रुग्णांची कोरोनावर मात; तर ३५,१७८ रुग्णांवर उपचार सुरू

Corona Virus, Maharashtra

मुंबई, २६ मे: देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सोमवारी राज्यात नव्या २ हजार ४३६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५२ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात १ हजार १८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १५ हजार ७८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत काल दिवसभरात १ हजार ४३० कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता ३१ हजार ९७२ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात एकूण ३८ रुग्णांनी जीव गमावल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार २६ झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पुणे शहरात सोमवारी तब्बल ३९९ नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंत एका दिवसातील नव्या रुग्णांची ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या आता ५ हजार १८१ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत २६४ बाधित रुग्ण दगावले आहेत.

तसेच राज्यात काल ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १ हजार ६९५ वर पोहोचला आहे. काल मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत ३८, पुण्यात ११, नवी मुबंईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबादेत २, सोलापुरात १, कल्याण डोंबिवलीत १ आणि रत्नागिरीत १ मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या २४ तासात येथे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधितांचा आकडा आता ८०४ वर पोहोचला आहे. आज कोरोनाच्या ३८ रुग्णची वाढ झाली आहे. तर आतापर्यंत २७२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे येथे चिंता वाढत चालल्या आहेत.

 

News English Summary: Corona’s havoc continues in the state, including the country. On Monday, 2,436 new patients were added to the state. As a result, the number of corona victims in the state has now reached 52,667. 1 thousand 186 patients were discharged during the day yesterday. So far, 15,786 people in the state have overcome corona. At present 35 thousand 178 patients are undergoing treatment.

News English Title:  On Monday 2436 new patients were added to the Maharashtra state News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x