2 May 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

आपत्ती व्यवस्थापन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये चर्चा

Maharashtra CM Uddhav Thackeray, Union Home Minister Amit Shah, Cyclonenisarga

नवी दिल्ली, २ जून : महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याचा धोका असल्याने सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं. 3 जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ हे कोकण किनारपट्टीसह मुंबईच्या किनाऱ्यावरही धडकण्याची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याने संभाव्य काय खबरदारी घेतलेली आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिली. राज्य सरकारने मुंबई, ठाणे, कोकण, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या भागात अलर्ट घोषीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. NDRFची पथकं किनारपट्टीच्या भागात तैनात करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.

देशभरात दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईत कोरोना अतिशय वेगाने फोफावत आहे. असं असलं तरीही इथेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण समाधानकारकरित्या वाढलं आहे. त्यामुळं कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंता वाढवत असला तरीही त्यातून सावरणाऱ्यांची संख्या ही काही अंशी दिलासा देऊन जात आहे. त्यामुळं येत्या काळात देश कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याच्याच दिशेनं यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास वर्तवण्यास हरकत नाही.

 

News English Summary: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Monday night held a video conference with Union Home Minister Amit Shah over the threat of a ‘nature’ cyclone in Maharashtra. Against the backdrop of this crisis, Shah assured the Chief Minister of full support from the Center.

News English Title: Maharashtra CM Uddhav Thackeray held a discussion with Union Home Minister Amit Shah through video conference over Cyclonenisarga News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x