1 May 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

BREAKING NEWS - गुगलकडून चिनी Apps केवळ तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक

Google PlayStore, Temporarily blocked, Chinese apps

नवी दिल्ली, २ जुलै : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, टिकटॉकच्या एकूण जागतिक व्यवसायापैकी ३० टक्के व्यवसाय भारतात होत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बंदी कायम राहिल्यास टिकटॉकला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर टिकटॉकच्या व्यवस्थापनाने केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यासाठी देशातील मोठ्या कायदेतज्ज्ञांना न्यायालयात उतरवण्याची तयारी कंपनीने केली आहे.

मात्र अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ५९ चिनी अँपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे, त्यांना गुगलने अजून कायम स्वरूपी प्ले-स्टोअरवर डिलीट केलेलं नाही. तसेच संबंधित apps प्ले-स्टोअर तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक केले आहेत अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

 

News English Summary: Google has said it has temporarily blocked access to those apps that were still available on the Play Store in India even after the government banned 59 Chinese apps this week.

News English Title: Google PlayStore has said it has temporarily blocked access to those Chinese apps News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)#TikTok(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x