26 April 2024 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सचिन पायलट यांचं राजकीय बंडखोरीचं विमान लँडिंगच्या तयारीत

Rajasthan political crisis, Sachin Pilot, Congress, Rahul Gandhi

नवी दिल्ली, १३ जुलै : काल सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केल्यानंतर आमदारांसमवेत दिल्लीला प्रयाण केल्यानंतर जयपूरमध्ये काँग्रेस पक्षांच्या आमदारांसाठी विधीमंडळ पक्षाची बैठक जाहीर करण्यात आली. त्यासाठी पक्षाने व्हिप जारी केला. दिल्लीत दाखल झालेल्या आणि नंतर गुरगाव येथील हॉटेलात आपल्या १५ काँग्रेस आणि ३ अपक्ष आमदारांना समवेत बसलेल्या सचिन पायलट यांच्याशी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ४० मिनिटे चर्चा केली. मात्र त्यानंतर सचिन पायलट यांनी भाजपात जाणार नाही, असे सांगितल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा पायलट यांच्याशी संपर्क सुरू ठेवला. तर दुसरीकडे जयपूरमध्ये अशोक गहलोत यांनी स्वतःचे शक्तिप्रदर्शन केले आणि १०९ आमदारांचा पाठिंबा मिळविला.

कर्नाटक, मध्य प्रदेशपाठोपाठ आता राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार कोसळणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पुकारले बंड अखेर थंड झाल्याची चिन्ह आहे. सचिन पायलट यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे. तर काँग्रेसनेही १०९ आमदाराचा पाठिंबा असल्याचं जाहीर केले आहे.

सचिन पायलट यांच्यासोबत असलेल्या आमदारांची नावे राकेश पारीक, मुरारी लाल मीना, जी,आर. खटाणा, इंद्राज गुर्जर, गजेंद्र सिंह शक्तावत, हरीश मीना दीपेंद्रा सिंह शेखावत भवरलाल शर्मा, इंदिरा मीना, विजेंद्र ओला, हेमाराम चौधरी, पी. आर. मीना, रमेश मीना, विश्र्वेंद्र सिंह, रामनिवास गावडीया, मुकेश भाकर आणि सुरेश मोदी अशी आहेत. यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाच्या विप मोडल्याबद्दल कारवाई होऊ शकते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी नेत्यांना पक्षाचा विध्वंस करू दिला जाणार नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिन पायलट यांना जादा अधिकार देऊन पुन्हा उपमुख्यमंत्री पद दिले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरुन अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. तसंच दुसरीकडे सचिन पायलट हे सकाळपासून राहुल गांधी यांच्या संपर्कात होते. सचिन पायलट यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, त्यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. तर प्रियांका गांधी यांनीही मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.

दरम्यान, अजय माकन यांनी, ‘काँग्रेसकडे १०९ आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही हा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठविला आहे. गहलोत सरकार स्थिर आहे, बहुमत सिद्ध करेल आणि गहलोत यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास आहे’, असं स्पष्ट केले. तसंच, बंडखोर नेत्यांशीही सहानुभूतीपूर्वक वागले पाहिजे असे निर्देश राहुल गांधींनी दिले आहे, अशी माहितीही माकन यांनी दिली.

 

News English Summary: Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi tried to communicate with both the leaders. Rahul Gandhi had a discussion with Ashok Gehlot on Randeep Surjewala’s phone. On the other hand, Sachin Pilot has been in touch with Rahul Gandhi since morning.

News English Title: Rajasthan political crisis Sachin Pilot should return to the party congress leader Rahul Gandhi Gandhi message News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x