28 April 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th pay commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
x

गुजरातमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

Doctor Babasaheb Ambedkar, statue desecrated, Sihor, Gujarat Bhavnagar

भावनगर, १४ जुलै : गुजरातमधील सिहोर जिल्ह्यात महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काल सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा चेहरा झाकला. त्याचबरोबर या परिसरात पुतळ्याशेजारी रिकाम्या दारूच्या बाटल्या ठेवल्या. हे संतापजनक कृत्य काही स्थानिक नागरिकांनी आज सकाळी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ सिहोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सोमवारी मध्यरात्री ते आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात असंतोष निर्माण झाला असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

 

News English Summary: In the Sehore district of Gujarat, the great man, His Holiness Dr. Babasaheb Ambedkar’s statue has been desecrated by unknown miscreants. Police have registered a case under Section 295 against unknown persons in this regard.

News English Title: Doctor Babasaheb Ambedkar statue desecrated in Sihor in Gujarat Bhavnagar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x