27 April 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

CBI ला राजस्थानची दारं बंद होताच, अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

Rajasthan CM Ashok Gehlot, Ed In Fertiliser Scam, sachin Pilot

जयपूर २२ जुलै: राजस्थानमधल्या सत्तेच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेत केंद्राच्या आधीन असलेल्या CBIला राजस्थानची दारं बंद केली आहेत. आता राज्य सरकारच्या परवानगी शिवाय CBIला राज्यात कुठल्याही प्रकारचा तपास करता येणार नाही. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अशोक गेहलोत यांची खुर्ची डळमळीत झाली असून या काळात केंद्र सरकार CBIचा वापर करून आपल्याला धक्का देऊ शकते अशी शक्यता वाटल्यानेच गेहलोत यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.

या आधीचा राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान झालेला करार रद्द करण्यात आला आहे. आता सरकारने नवीन आदेश काढले असून त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार आमने-सामने आलं आहे. राज्याल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागितल्याने राज्य सरकार खडबडून जागं झालं असून त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. तर राज्यात सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांवर आयकर विभागाने छापेही टाकले होते. त्यावरूनही केंद्र सरकारवर काँग्रेसने टीका केली होती.

दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. कथित खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून बुधवारी सकाळी घोटाळ्या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीचाही समावेश आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडून जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे. ही कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे. कस्टम विभागाने खटला चालवत कंपनीवर सात कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. ईडीकडून राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

 

News English Summary: The company of Chief Minister Ashok Gehlot’s brother has been raided by the ED as political power struggles are raging in Rajasthan. The raid was carried out by the ED in connection with the alleged fertilizer scam. The ED is conducting raids at various places on Wednesday morning in connection with the scam.

News English Title: Rajasthan CM Ashok Gehlots Brother Raided By Ed In Fertiliser Scam News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x