3 May 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

आज राज्यात ११,१११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २८८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १६ ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज दिवसभरात राज्यात 11,111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 288 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाखांच्या जवळ पोहचली आहे. सध्या राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 95 हजार 865 इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 17 हजार 123 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याचा रुग्ण दर काही प्रमाणात सुधारला आहे. राज्यातील सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 70 टक्के इतका आहे.

दरम्यान, कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन करुनही राज्यातला कोरोनाचा हाहाकार काही थांबला नाही. रोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. अशात सगळी शहरं आता अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण संपूर्ण लॉकडाऊन कधी हटवण्यात येणार हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. पण राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन उठवण्याची काही घाई नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उलट जिथे लॉकडाऊन उठवण्याची घाई करण्यात आली तिथे पुन्हा लॉकडाऊन केलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The ever-increasing number of corona victims in Maharashtra is raising concerns in the state. Today, there is an increase of 11,111 new corona patients in the state. In the last 24 hours, 288 corona victims have died.

News English Title: 11111 new corona positive patients and 288 deaths reported in Maharashtra today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x