28 April 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

पीडितेच्या कुंटुबीयांचा पोलिस आणि सरकारवर विश्वास नाही | जीव वाचावा म्हणून गाव सोडणार

Hathras victim, Gang rape, Uttar Pradesh, Yogi Sarkar

लखनऊ, १ ऑक्टोबर: हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेच्या तपासासाठी ३ सदस्यीय टीम हाथरस येथे पोहोचली आहे. यामध्ये महिला अधिकारी देखील आहे. मानवाधिकार आयोगने याप्रकरणी मुख्य सचिव आणि डीजीपीला नोटीस पाठवली आहे. एसआयटीला ७ दिवसात आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलंय. परिस्थितीचे गांभीर्य पाहता यूपी सरकारने तपासासाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष टीम तयार केली आहे. लवकर न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाईल. याप्रकरणी एका याचिकेवर आज इलाहाबाद हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार आणि अमानुष हत्येच्या घटनेतील पीडित दलित मुलीचे कुटुंबीय अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. “काहीही घडू शकतं, आम्हाला सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे गाव सोडण्याचा विचार आहे,” असं पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पीडितेच्या भावानं म्हटलं, “आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही.”

 

News English Summary: The body of the 19-year-old dalit woman, who was gang-raped in UP’s Hathras and later died on Tuesday, was cremated in the dead of the night on Wednesday with family members alleging they were forced by police to hurriedly conduct the last rites. Protests broke out in several parts of the country with political leaders and activists voicing their indignation over the horrific incident and the manner in which the funeral was conducted near the woman’s home in Hathras.

News English Title: Hathras victims family may leave the village because no trust on Uttar Pradesh Police Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x