4 May 2024 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

काल पंकजा मुंडेंशी मतभेद | आज भाजपा आ. सुरेश धस यांना पवारांसोबतच्या बैठकीत प्रवेश

BJP MLA Suresh Dhas, Sugarcane Workers, Sharad Pawar

बीड, २७ ऑक्टोबर: २१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी काल आदेश दिले होते. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात (Sugarcane worker) फूट पडल्याचं चित्र होतं. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं काल पाहायला मिळत होतं.

महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, तसंच माझ्यासहित ११ संघटनांच्यावतीने, मुकादमांचं कमिशन साडे १८ टक्क्कांवरुन ३७ टक्के करण्यात यावं, ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये १५० टक्के वाढ करण्यात यावी तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ ५० टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी काल सांगितलं होतं. दरम्यान आम्हाला जोपर्यंत दरवाढ मिळत नाही तोपर्यंत ११ संघटनांचं आंदोलन सुरुच राहील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय.

पुण्यात ऊस तोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे नेते सुरेश धस यांना येता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्या निर्णयामुळे धस आक्रमक झाले. त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनानंतर त्यांना बैठकीसाठी आत बोलवण्यात आले. “ज्यांनी मला बैठकीसाठी येऊ दिले नाही. तसेच आमच्या जिल्ह्यातील काही लोक आतमध्ये आहेत. त्यांना जाऊन विचारा” अशी भूमिका मांडत भाजपचे नेते सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत.

 

News English Summary: In Pune, a meeting has been organized at Vasant Dada Sugar Institute under the chairmanship of NCP’s Sarvesarva Sharad Pawar on the issue of sugarcane workers. BJP leader Suresh Dhas will not be able to attend the meeting. That decision made Dhas aggressive. They started agitation at that place. After the agitation, they were called in for a meeting.

News English Title: After Protest BJP MLA Suresh Dhas Allowed To Enter Meeting On Sugarcane Workers News updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x