29 April 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

हे हिंदू गद्दार | आंदोलक शेतकऱ्यांसमोरील भाषणात युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

Yuvraj Singh Father, controversial statement, against Hindus, Kisan Andolan Delhi

नवी दिल्ली, ५ डिसेंबर : केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.

शेतकरी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करत आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीत यश नक्की मिळेल. ‘मी शेतकऱ्यायांना हमी देतो की एमएसपीमध्ये कोणताही बदल होणार नाही. संघाची इच्छा असल्यास आम्ही ते लेखी देण्यास तयार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) बळकट करणे देखील आमचे प्राधान्य आहे असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, वादग्रस्त विधानांमुळे नेहमी वादात सापडणारे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी शेतकरी आंदोलकांमध्ये जाऊन वादग्रस्त भाषण दिले आहे. योगराज यांनी हिंदूंवर वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. माजी क्रिकेटपटू युवराजचे वडील योगराज हे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे. यादरम्यान त्यांनी हिंदूंसाठी गद्दार या शब्दाचाही वापर केला. “हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असंही ते यात म्हणताना दिसत आहे. तसंच महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यापूर्वी योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.

 

News English Summary: Farmers in Punjab and Haryana have been protesting against the three agricultural laws brought by the central government for the last eight days. Today is the 9th day of this movement. Four meetings so far with Union Home Minister Amit Shah and Union Ministers have failed and farmers are still adamant about their role. Farmers are demanding repeal of the agriculture bill. So the farmers are in the mood to take concrete decisions, not just assurances.

News English Title: Cricketer Yuvraj Singh Father gave controversial statement against Hindus duirng Kisan Andolan Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x