3 May 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

आदित्य ठाकरे तरुण आहेत | त्यांनी किमान कांजूरमार्ग कारशेडबाबत सौनिक समितीचा अहवाल वाचावा

Devendra Fadnavis, Minister Aaditya Thackeray, Kanjurmarg Metro 3, car shed land

मुंबई, १६ डिसेंबर: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचा या निर्णयामुळं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट करत या आदेशाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, “पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या आदेशाची लिखित सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्वाची आहे. यामुळे सरकारचे ५ हजार ५०० कोटी रुपये वाचत आहेत. १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे.”

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. नवीन मंत्री आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असं सांगतानाच किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा. कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिला. आदित्य ठाकरे नवीन आहेत. नवे मंत्री आहेत. त्यांनी जनहितासाठी काम करावं. त्यांच्याच सरकारने सौनिक समिती स्थापन केली होती. या चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिला आहे. त्याचा आदित्य यांनी अभ्यास करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

 

News English Summary: After Aditya Thackeray’s reaction, Devendra Fadnavis has also given an answer. Aditya Thackeray is young. There are new ministers. There are a lot of expectations from them, at least Aditya Thackeray should read the report of the Sonic Committee. Opposition leader Devendra Fadnavis advised Aditya Thackeray to study what the committee said about Kanjurmarg car shed.

New English Title: Devendra Fadnavis reply to minister Aaditya Thackeray over Kanjurmarg Metro 3 car shed land news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x