29 April 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राज ठाकरे अयोध्येला जात असतील तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करू - संजय राऊत

Shivsena, MP Sanjay Raut, Raj Thackeray, tour of Ayodhya

मुंबई, २९ जानेवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.

दरम्यान, यावरून शिवसेनेची प्रतिक्रिया देखील आली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू”, असं संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

 

News English Summary: Shiv Sena has also reacted to this. If Raj Thackeray is going on a tour of Ayodhya, it is a good thing. Lord Rama is not a subject of any politics. We have been to Ayodhya many times. If they want to go too, they should go. We will guide them, “said Sanjay Raut while interacting with the media.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut talked on Raj Thackeray tour of Ayodhya news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x