27 April 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Maha Budget 2021-22 | ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये

Maha Budget 2021-22, Thane Rounded Metro project

मुंबई, ०८ मार्च: करोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

रस्ते, पायाभूत विकासासाठी विशेष तरतुदी:

  1. रेल्वे मार्ग विकासासाठी 16139 कोटी रुपयांची तरतूद
  2. राज्यातील रस्ते विकासासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद
  3. पुणे, नगर नाशिक रेल्वे विकासावर केला जाणार खर्च
  4. पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
  5. ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
  6. समृद्धी महामार्गाचा 500 किमीचा रस्ता 1 मे पासून खुला
  7. नांदेड जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
  8. अहमदनगर, बीड, परळी, वर्धा येथील रेल्वेमार्गांच्या कामाला वेग आणणार
  9. पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
  10. समृद्धी महामार्गाचे 44% काम पूर्ण झाले
  11. आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटी
  12. 5689 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची कामे करणार
  13. ग्रामीण भागांमध्ये 10 हजार किमी रस्त्यांची कामे होतील
  14. पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी
  15. पुणे-नाशिक मार्गावर 24 प्रकल्पांना मंजुरी
  16. एसटी विभागाला 1 हजार 400 कोटी निधी देण्यात येणार
  17. महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
  18. गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
  19. ग्रामविकास मंत्रालयासाठी 7350 कोटी रुपयांची तरतूद

 

News English Summary: Maharashtra Budget 2021-22 was presented by Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar in the Legislative Assembly. This is the second budget of the Maha Vikas Aghadi government in the state. Deputy Chief Minister Ajit Pawar started presenting the budget in the Assembly at 2 pm. Minister of State for Finance Shambhuraj Desai will present the budget in the Legislative Council.

News English Title: Maha Budget 2021 22 special provision for Thane Rounded Metro project news updates.

हॅशटॅग्स

#Thane(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x