26 April 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

मोठा निर्णय | विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली

MPSC Exam, Postponed, Maharashtra Government, Corona Spread

मुंबई, ९ एप्रिल: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्यावी म्हणून गेल्या महिन्यात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते. विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे. विद्यार्थी परीक्षा ढकलण्याची मागणी का करत आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नेमकी भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधत एमपीएससीच्या परीक्षांविषयी महत्त्वाची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील MPSCची पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ११ एप्रिल रोजी MPSCची पूर्व परीक्षा होणारी होती. मात्र, आता ही परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. सरकारने अखेर या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने काही कडक पावले उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर, विकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी देखील अनेक कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यातील याच कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर, MPSCपूर्व परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

 

News English Summary: The pre-examination of MPSC in the state has been postponed once again. This very important decision has been taken in the meeting of Chief Minister Uddhav Thackeray. The pre-examination of MPSC was scheduled to be held on April 11. However, this examination has been postponed once again. A very important decision has been taken by the government for the students of MPSC.

News English Title: MPSC Exam On 11 April Postponed By Maharashtra Government amid Corona Spread news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x