27 April 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पंढरपूर पोटनिवडणूक | जयंत पाटील भर पावसात भिजले आणि पवारांच्या सातारच्या सभेची आठवण

Minister Jayant Patil, Pandharpur Mangalvedha

पंढरपूर , १२ एप्रिल: पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भरपावसात भिजले आणि सातारामधील शरद पवारसाहेबांच्या पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली.

आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली मात्र सभा आटोपती न घेता जयंत पाटील यांनी पावसाच्या साक्षीने भगीरथ भालके यांच्या विजयाचे सूतोवाच केले.

मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना भालके २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजपसरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका घेतली होती याची आठवण करून दिली.

योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले मात्र ते कधीच फिरकले नाहीत. परंतु भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

सत्ता गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वेड लागले आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा, भारत नानांचा हा मुलगा आदरणीय पवारसाहेबांच्या आशिर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त

 

News English Summary: At a public meeting in Bhagirath Bhalke’s campaign in Pandharpur, NCP state president and water resources minister Jayant Patil was drenched in rain and the memory of that meeting in the rain of Sharad Pawar in Satara faded before the eyes of Pandharpur.

News English Title: Rain during Minister Jayant Patil speech at Pandharpur Mangalvedha by poll news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x