4 May 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

राजकीय पक्षाला रेमडेसिवीर मिळालीच कशी हा मूळ प्रश्न | चंद्रकांतदादा पाकिस्तान, चायना, देशाच्या घटनेवर बोलत बसले

Chandrakant Patil

मुंबई, १९ एप्रिल: आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

आम्ही रेमडेसिवीरचं वाटप केलं तर त्यात काय चुकलं? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवं आहे. लोक वणवण भटकत आहेत. 22 तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही, असंही ते म्हणाले. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुळात राजकीय पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर इंजेशन्स परवानगी नसताना ते मिळालेच कसे हा मूळ प्रश्न होता. मात्र चंद्रकांतदादांनी भाजपचं देशपातळीवरील तंत्र उपसलं आणि मूळ प्रश्नाला तसेच कायदेशीर नियमांना बगल देत चायना आणि पाकिस्तान असा शब्दांचा मारा सुरु केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सामान्यांना एक नियम आणि भाजपसाठी थेट कायद्यात बदल केला काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

News English Summary: Were we going to take Remedesivir and give it to Pakistan or China? We were going to give it to Maharashtra. So if you take Remedesivir, where is the mistake? This question was asked by BJP state president Chandrakant Patil.

News English Title: BJP state president Chandrakant Patil talked on Remedesivir purchase news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x