27 April 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

मोदी है तो मुमकिन है | महागाईने लोकांचं जगणं महागलं | खाद्यतेलाची किंमत 11 वर्षात सर्वात जास्त

Modi Bhakt

नवी दिल्ली, ०५ जून | भारत देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. देशात पेट्रोल डिझेलसह इतर ही वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खाद्यतेलाच्या तेलाच्या किंमती 11 वर्षांत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.

एका अहवालानुसार, मोहरीच्या तेलाच्या किंमतीत सुमारे 44 टक्क्याने वाढ झाली असून 28 मे रोजी किरकोळ बाजारात त्याची किंमत 171 रुपये प्रति लीटर नोंदविण्यात आली. तर गेल्या वर्षी 28 मे रोजी एका लिटर मोहरीच्या तेलाची किंमत 118 रुपये होती. त्याचबरोबर सूर्यफूल तेलाच्या किंमतीतही 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटनुसार, गेल्या वर्षभरात या तेलांच्या किंमती 20 ते 56 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. देशातील एक मोठी लोकसंख्या कोरोना महामारीमुळे लावलेल्या लॉकडाऊन आणि महागाईशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट खराब झाले आहे. भारत देशातील लोक आपल्या आहारात 6 प्रकारच्या खाद्यतेलाचा वापर करत असून यामध्ये मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल, डालडा (वनस्पती तेल), रिफाइंड (सोया तेल), सूर्यफूल तेल (सनफ्लावर ऑयल) आणि पाम तेल यांचा समावेश आहे.

News English Summary: Inflation in India has risen sharply. This is causing financial loss to the common man. Many people have become unemployed due to lack of manual labor in the lockdown. The prices of petrol, diesel and other commodities in the country are increasing day by day. Against this backdrop, edible oil prices have risen sharply in the last one year. As a result, edible oil prices are said to be the highest in 11 years.

News English Title: Edible oil prices have risen sharply after last 11 years news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x