29 April 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आगामी BMC निवडणुक | उत्तर भारतीय मतदारांचा फटका त्यात शिवसेनासोबत नाही | भाजपची महत्वाची बैठक

Mumbai corporation election 2022

मुंबई, ०९ जून | संपूर्ण देशात अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर महत्वाची जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला उत्तर भारतीय मतदारांचा फटका बसण्याची शक्यता आहे. युपी आणि बिहारमध्ये कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने मूळचे उत्तर भारतीय पण मुंबईत स्थायिक झालेले मतदार भाजपवर रोष व्यक्त करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणेज कोरोनामुळे ज्या यातना उत्तर भारतीयांच्या नातेवाईकांनी युपी-बिहारमध्ये भोगल्या तसा त्रास किंवा यातना मुंबईतील उत्तर भारतीयांच्या नशिबी आलेल्या नाहीत . परिणामी हाच मुद्दा शिवसेना प्रचारात उचलण्याची शक्यता आहे. तसेच गुजराती मतदारांशी देखील शिवसेनेने संपर्क वाढवला आहे. त्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत शिवसेना सोबत नसल्याने मराठी मतदारही दुरावणार असल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.

आज दुपारनंतर भारतीय जनता पक्षाची ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की अन्य कुणाला सोबत घ्यायचं यावरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सदर बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले, त्या मतदारसंघांसाठी या बैठकीत खास रणनीती तयार करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

News English Summary: Preparations have started for the Mumbai Municipal Corporation elections, which are very important in the entire country. The Bharatiya Janata Party (BJP) has started preparations for next year’s Mumbai Municipal Corporation elections. The Bharatiya Janata Party is holding an important meeting in Mumbai today on the backdrop of this election. The meeting, which will be attended by BJP leader Devendra Fadnavis, is likely to give important responsibilities to some leaders in the run-up to the elections.

News English Title: Mumbai BJP party meeting today ahead of Mumbai corporation election 2022 news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x