17 May 2024 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

ब्रिटनमध्ये मे महिन्यात डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ | निर्बंधांमध्ये वाढ

Covid Delta variant

लंडन, १७ जून | कोरोनावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करणाऱ्या ब्रिटनच्या चिंतेत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये मे महिन्यात करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काही दिवसापूर्वीच अनलॉकची प्रक्रिया जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या संशोधनानुसार, नव्या वेरिएंटचा संसर्ग वाढत आहे. फक्त ११ दिवसांमध्येच बाधितांची संख्या दुप्पट होत आहे. या अभ्यासात जवळपास एक लाख जणांची पाहणी करण्यात आली होती. करोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण वेगाने करण्याची सुचनाही करण्यात आली आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेष्ठ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना औषध आणि आरोग्य उपकरण तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात औषधांचा साठा करणे आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर जोर दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Delta variant of Covid spreading in United Kingdom government focus on vaccination news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x