16 May 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

रविवारी लसीचा साठा, सोमवारी लसीकरण आणि मंगळवारी जैसे थे स्थिती - पी चिदंबरम

P Chidambaram

मुंबई, २३ जून | देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल ८८ लाख लोकांचे लसीकरण झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. परंतु या विक्रमावर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रविवारी लसीचा साठा केला, सोमवारी लसीकरण केले अन् त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी जैसे थे स्थिती झाली असा दावा पी. चिंदबरम यांनी केला आहे. चिंदबरम यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पी. चिंदबरम यांनी ट्विट करून म्हटलं की, रविवारी लसींचा साठा करण्यात आला. सोमवारी लोकांचे लसीकरण झाले आणि मंगळवारी पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. एका दिवसात लसीकरण करण्याचा विक्रम करण्यामागे हेच गुढ रहस्य आहे. मला विश्वास आहे केंद्राच्या या करकुतीला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जागा मिळाली आहे. पुढच्या ट्विटमध्ये ते सांगतात की, कोणाला ठाऊक, पण मेडिसिनचा नोबेल पुरस्कार मोदी सरकारलाही दिला जाऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है या वाक्याऐवजी आता मोदी है, तो चमत्कार है असं वाचायला हवं असा टोला चिंदबरम यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Congress leader P Chidambaram questions record most vaccinations Modi government news updates.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x