6 May 2024 8:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

फ्रिलांसींग म्हणजे काय? घरबसल्या स्वतंत्ररित्या मेहनत करून मिळवा पैसे | या वेबसाईट्स देतात काम

Freelancing work from home

मुंबई, ०९ जुलै | आता कोरोना मुळे बर्‍याच कंपन्या मध्ये वर्क फ्रॉम होम चालू आहे. पण बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या देखील गेलेल्या आहेत तर काहींचे व्यवसाय बंद पडलेत. अशा परिस्तिथित अनेक तरुणांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ह्याच गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपल्या साठी घरबसल्या काम मिळवून देणार्‍या काही वेबसाइट ची यादी घेऊन आलो आहे ज्याच्यावर तुम्हाला घरबसल्या काम मिळू शकते व तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल.

घरी बसून काम पाहिजे चला तर मग या लेखा मध्ये तुम्हाला घरबसल्या काम मिळवून देणार्‍या फ्रिलांसींग वेबसाईट्स बद्दल सर्व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल जसे की फ्रिलांसींग वेबसाईट्स म्हणजे काय ? त्या कसे काम करतात? आर्थिक नफा कसा मिळतो ? फ्रिलांसींग वेबसाईट्सची लिस्ट.

फ्रिलांसींग वेबसाईट्स’वर घरबसल्या काम कसे मिळते?
फ्रिलांसींग वेबसाइट वर तुम्ही रजिस्टर करताना तुम्हाला तुमच्या कडे कोणती कला आहे किंवा कोणते काम तुम्ही उत्तमरीत्या करू शकता ही सर्व माहिती द्यावी लागते.म्हणजे तुम्ही जसे कुठे जॉब मिळवण्यासाठी तुमचा रेज्युम बनवून कंपनी मध्ये देता तसेच तुम्हाला ऑनलाइन करायचे आहे.

अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्ही आज पर्यन्त केलेल्या कामाचा अनुभव तसेच त्याची काही माहिती किंवा सर्टिफिकेट तुमच्या कडे असेल तर ते देखील तुमच्या प्रोफाइल ल अपडेट करा.

फ्रिलांसींग वेबसाइट वर ज्या प्रकारे तुम्ही काम शोधत आहात त्याच प्रमाणे विविध कंपन्या देखील अशा वेबसाइट वर त्यांचे काम करण्यासाठी स्टाफ शोधत असतात. तुम्हाला अशा जॉब ला किंवा कामांना अर्ज करायचे आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर कंपनी / किंवा ज्याने काम पोस्ट केले आहे ती व्यक्ति तुमची प्रोफाइल बघेल व जर त्यांना तुम्ही त्यांचे काम करण्यास योग्य उमेदवार वाटत असाल तर ते काम तुम्हाला मिळेल.

फ्रिलांसींग वेबसाइट वर काम करत असताना दिलेल्या वेळेत व योग्य प्रकारे काम करणे अपेक्षित असून तुम्ही अश्या प्रकारे काम केल्यास तुम्हाला चांगले रेटिंग मिळते व भविष्यातील कामे मिळवण्यास त्याचा फायदा होतो.

घरबसल्या कोणत्या प्रकारचे काम करता येऊ शकते:
* तुम्ही अशा प्रकारच्या वेबसाइट वरुण घरबसल्या कोण कोणत्या प्रकारचे काम करू शकता ते आता बघूयात. जर तुमचे कॉमर्स मध्ये शिक्षण झाले असेल तर तुम्ही अकाऊंटिंग चे काम घेऊ शकता. तसेच जीएसटी शी संबंधित कामे देखील तुम्ही घेऊ शकता.

* आपण जर इतर कोणते ग्रॅजुएशन केले असेल आणि आपण टुशन घेऊ शकत असाल तर अशा प्रकारचे शिकवणीचे देखील काम आपल्याला अशा वेबसाइट वर मिळेल.

* सिव्हिल इंजीनीरिंग झाले असेल तर प्लान काढून देण्यासारखे काम आपण ह्या वेबसाइट वर मिळवू शकता. तसेच सिव्हिल शी संबंधित इतर कामे देखील आपण करू शकता.

* आपले जर लिखाण चांगले असेल तर आपण मराठी,हिन्दी किंवा इंग्लिश भाषेमध्ये ब्लॉग रायटींग चे घरबसल्या लिखाण काम करू शकता. तसेच एखाद्या विषयावर आपले प्रभुत्व असेल तर आपण त्या संधर्भात लिखाण काम करू शकता.

* आपल्याला जर ऑनलाइन मार्केटिंग चे तंत्र अवगत असेल,किंवा आपल्याला ऑनलाइन फेसबूक,इनस्टाग्राम,ट्वीटर सारख्या सोशल मीडिया साइट वर जाहिरात काशी करायची याची माहिती असेल तर आपण ते देखील काम इथे करू शकता.

* डाटा एंट्री, टायपिंग तसेच मायक्रोसॉफ्ट च्या MSWord, MSExcel मध्ये आपण काम करू शकत असाल तर त्या संधर्भात देखील काम आपल्याला इथे मिळेल. जसे की एक्सेल मध्ये चार्ट बनवणे,प्रेझेंटेशन बनवणे इत्यादी.

वरील पर्यायांपेकी जर आपण कश्यातच पारंगत नसाल तरी कलगी करू नका अजून बर्‍याच प्रकारची कामे ह्या वेबसाइट वर उपलब्ध असतात. जसे की लोगो डिजाईन,ग्राफिक्स डिजाईन व इतर. आपल्याला जर आता ग्राफिक्स डिजाइन चे काम येत नसेल पण करायची इच्छा असेल तर आपण आपल्या मोबाइल वरुण देखील ते उत्तमरित्या करू शकता त्यासाठी canva, picsart ह्या मोबाइल apps ची आपण मदत घेऊ शकता.

घरबसल्या काम देणार्‍या वेबसाइटची यादी:
१) Freelancer
२) Guru
३) Upwork
४) Fiverr
५) Toptal
६) PeoplePerHour
७) Hireable
८) DesignHill
९) 99designs
१०) FlexJobs

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Freelancing work from home business sites for income details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#startup(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x