12 May 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

गाडी स्क्रॅप केल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत | पंतप्रधानांची घोषणा

National Automobile Scrappage Policy in India

मुंबई, १३ ऑगस्ट | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केलीय. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंतवणूकदार शिखर परिषदेत भाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ही पॉलिसी देशातील असुरक्षित वाहने वैज्ञानिक पद्धतीने भंगारात काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते.

जुन्या वाहनांमुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त:
पीएम मोदी म्हणाले की, जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त आहे, ज्याला आळा बसू शकेल. त्याचबरोबर प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम कमी होणार आहे.

या धोरणाचा सामान्य कुटुंबांना प्रत्येक प्रकारे फायदा होईल. पहिला फायदा असा की जुनी कार स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल. ज्या व्यक्तीकडे हे प्रमाणपत्र असेल त्याला नवीन वाहन खरेदीवर नोंदणीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. यासह, त्याला रस्ते करातही काही सूट दिली जाईल. दुसरा फायदा असा की देखभाल खर्च, दुरुस्ती खर्च, जुन्या वाहनाचे इंधन देखील वाचेल. तिसरा फायदा थेट जीवनाशी संबंधित आहे. जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यातून सुटका होईल. चौथे, प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणामही कमी होईल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काय आहे स्क्रॅप पॉलिसी?
१५ आणि २० वर्षे जुनी वाहनांवर बंदी घातली जाईल. व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्षे आणि खासगी वाहनांसाठी २० वर्षाचा कालावधी ठऱवण्यात आला आहे. निर्धारित वेळेनंतर वाहने ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमध्ये घ्यावी लागतील. खाजगी कंपन्या ऑटोमेटेड फिटनेस सेंटर चालवतील आणि या गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा देखील या शिखर परिषदेचा मोठा अजेंडा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What is new National Automobile Scrappage Policy in India news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x