29 April 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

आता भारताने भूमिका बदलावी | कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचं ठरेल - तालिबान प्रवक्ते

Taliban in Afghanistan

काबुल, १६ ऑगस्ट | अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी हिब्तुल्लाह अखुंदझादाला नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. त्यालाच तालिबानने आमिर अल मोमिनीन असे संबोधले आहे. हिब्तुल्लाह या अरबी शब्दाचा अर्थ ईश्वरीय वरदान असा होता. पण, अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदाचा दावेदार हिब्तुल्लाह अखुंदझादा अतिशय क्रूर असा तालिबानी कमांडर आहे. एकेकाळी त्यानेच हत्या आणि अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांना ठार मारण्याचे फतवे काढले आहेत. एवढेच नव्हे, तर चोरी केल्यास हात कापण्याचे आदेश सुद्धा त्याने दिले आहेत.

मुल्ला मंसूरच्या खात्म्यानंतर बनला तालिबानचा चीफ कमांडर:
तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहंमद उमर याचा 2013 आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याच्यानंतर हकीमुल्लाह मसूदने तालिबानचे नेतृत्व केले. 2013 मध्येच त्याला ड्रोन हल्ल्यात ठार मारण्यात आले. 2015 मध्ये तालिबानने मुल्ला मंसूरला आपला नेता म्हणून निवडले. पण, 2016 मध्ये मुल्ला मंसूर सुद्धा ड्रोन हल्ल्यात मारला गेला. 25 मे 2016 रोजी तालिबानने आपल्या नवीन नेत्यासाठी हिब्तुल्लाह अखुंदझादाचे नाव पुढे केले.

तालिबान प्रवक्त्यांचं भारताला आवाहन:
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानच्या नवनिर्माणासाठीचा तालिबानचा रोडमॅप पूर्णपणे तयार असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल असंही तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.

भारत लवकरच आपल्या भूमिकेत बदल असेल अशी आशा आहे. कारण याआधी भारत इथं थोपविण्यात आलेल्या सरकारची बाजू घेऊन बोलत होता. त्यामुळे आता येणाऱ्या नव्या सरकारचीच ते बाजू घेतील कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचं ठरेल”, असं तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीननं म्हटलं आहे.

चीनचा मैत्रीसाठी हात:
दुसरीकडे, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.

पाकिस्तानचा पाठिंबा:
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानी सत्तेचं स्वागत केलं आहे. “गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे.”, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Taliban spokesman Suhail Shaheen says hope Indian govt will change stance support us took reconstruct news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x