14 December 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Brahmastra Star Cast Fees | सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार, पण 'ब्रह्मास्त्र' स्टार कास्टची मानधन आकडेवारी ऐकून व्हाल थक्क

Brahmastra star cast fees

Brahmastra Star Cast Fees | रणवीर आलियाच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील सुपरस्टार चेहरे एकत्र दिसून येणार आहेत ज्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भुमिकेत पडद्यावर झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे प्रमोशन आणि चर्चा जोरदार सुरू आहे. तर ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये अभिनेत्यांनी किती मानधन आकारले आहे ते जाणून घेऊयात.

स्टार कास्टने घेतली एवढी फी :
आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी सिनेमा लव्हर्स आणि व्यापार विश्लेषक काहीसे उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान चित्रपटाचे प्रमोशन आणि टिझर पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असे सांगितले जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचे डिरेक्शन अयान मुखर्जी यांनी केले असून, त्यांच्या अफाट प्रयत्यांनतर हा चित्रपट सत्यामध्ये उतरला आहे. या चित्रपटामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार हा सुपरस्टार आहे आणि त्यामुळेच त्यांचे मानधन देखील कोटींच्या घरामध्ये आहे.

* आलिया भट्ट – 10/12 Cr
* रणबीर कपूर – 25/30 Cr
* अमिताभ बच्चन – 8/10 Cr
* मौनी रॉय – 3 Cr
* नागार्जून – 9/11 Cr
* डिंपल कपाडिया – 1/2 Cr

ब्रह्मास्त्रचा सोशल मीडीयावर बहिष्कार :
गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर काही चित्रपटांबाबत बहिष्कार टाकण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये आता ब्रह्मास्त्रचे नाव सामील झाले आहे. 31 ऑगस्टच्या सकाळपासून #BoycottBrahmastra हा हॅशटॅग सुमारे 60,000 ट्विटसह ट्रेंड करत आहे. बायकॉट ब्रह्मास्त्रचे पोस्टर पाहिले तर, आलिया भट्टचे विधान ‘जर मला तुम्ही पसंत करत नसाल तर चित्रपट बघू नका’ यामुळे चित्रपटाचा बहिष्कार केला जात असल्याचे आता समोर येत आहे. दरम्यान रणवीर कपूरचे ‘बीफ चॉइस’चे विधान देखील चर्चेमध्ये आहे. यासोबतच सोशल मीडियावर काही आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या परिवाराला देखील टारगेट केले जात आहे.

ब्रह्मास्त्रमधील किंग खानचा व्हिडीओ व्हायरल :
आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक्साइटमेंट दिसून येत आहे. दरम्यान, सुरुवातीला अश्या बातम्या समोर येत होत्या की, चित्रपटामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा देखील कॅमिओ असणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किंग खान रक्ताने माखलेला तर पाटीमागे भला मोठा वानर आणि त्याची शेपटी दिसून येत आहे. शाहरूखच्या मागे वानर दिसून येत असल्याचे असे संकेत बांधले जात आहेत की, या चित्रपटामध्ये शाहरूख वानरच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे.

तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार ब्रह्मास्त्र :
दरम्यान, ब्रह्मास्त्र चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ब्रह्मास्त्र, दुसरा महादेव, तर तिसरा पार्वतीवर आधरित असणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये रणबीर आणि आलिया हे नवविवाहीत जोडपे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यांच्या भुमिकेचे शिव आणि ईशा असे नाव आहे. काही काळाच्या प्रतिक्षेनंतर अयानने प्रदर्शित केलेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे एक पौराणिक विश्व चाहत्यांपुढे निर्माण केले, असे म्हणायला हरकत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brahmastra star cast fees report Checks details 1 September 2022.

हॅशटॅग्स

#Brahmastra star cast fees(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x